Culture & Tradition
नवरात्र पौरणीमा/ कोजागिरी पौरणीमा (महिना : अश्विन)
आश्विन पौर्णिमेला नवरात्र पौर्णिमा असे संबोधन आहे. हीचेच दुसरे नाव कोजागिरी पौर्णिमा असे आहे. खरिपाचे पिक (हळवी जात) तयार झाल्यामुळ शेतकऱ्यानी कापणीच्या कामास सुरुवात केलेली असते. नवीन पिकाचे जेवण करण्यासाठी बळीराजा ह्या दिवसाची निवड करून नवपिकाची पूजा करून लाभ, बरकत, बहार असे म्हणत ते भात घरी उखळीत काढून त्याची खीर (लापशी) बनवून तिचा नैवैद्य घरातील आणि शेतावरिल त्यांच्या श्रद्धा असलेले काल्पनिक देवाना दाखविला जातो. आणि घरातील सर्वजण खातात. ह्या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हटले जाते. त्याची पुराणात असा उल्लेख आहे. की ह्या दिवशी आकाशात देवी लक्ष्मी, देवांचा खजिनदार कुबेर आणि देवराज इंद्र फेरफटका मारण्यास निघतात. आणि कोण जागा आहे हे पाहण्यासाठी "कोजागर्ति कोजागर्ति" असा आवाज देतात. जे जागे आसतात त्यांच्या वर लक्ष्मी आणि कुबेराची कृपा होते. त्यांच्या पाठोपाठ लक्ष्मीची खाष्ट बहीण फेरा मारते तिला आक्काबाई। म्हणतात. जे जागे नसतात निद्रिस्त। असतात त्याना ती शाप देते. त्याना दारिद्र्य येते. म्हणुनच एखादा मनुष्य चोहोकडून संकटात आला की त्याच्यावर आकाबाईचा फेरा आला असे म्हटले जाते. पुराणात हा पूजाविधि असा सांगितला आहे की ह्या दिवशी रात्रि पाटावर विडयाच्या पानांवर लक्ष्मी आणि कुबेर यांचे प्रतीक म्हणून पुगिफल( सुपारी) ठेवुन अक्षता,गंध,फुले ,फले वाहून पूजा करावी. ही पूजा रात्रि १२ ते १२.३९ ह्या दरम्यानच करावी.
गाईचे शुद्ध दूध घेवुन केशर आणि सुकामेवायुक्त पावडर घालून ते चन्द्रप्रकाशात चुल्हिवर (आता गैसवर) उकळविणे. त्या नंतर त्या दुधाची उकळी शांत झाल्यावर त्यात पूर्णचंद्र पहावा. त्यातील दुध नैवेद्य म्हणुन पूजेच्या ठिकाणी ठेवावे. नंतर घरातील सर्वानी ते दूध प्यावे.
इतिहासकार सभासदांच्या बखरित असा उल्लेख आढ़ळतो की अफजलखान वध करून जेव्हा शिवाजी महाराज परत आले त्यावेळी महाराणी सईबाईसाहेब निर्वर्तल्या होत्या. त्या आठवणीने राजे बेचैन होवुन रात्रि आपल्या वाड्याच्या सौंधावर येरझाऱ्या घालित होते. इतक्यात त्याना "कोजागर्ति"असा आवाज ऐकू आला. त्याचक्षणी अष्टावधा नी राजांनी उत्तर दिले "अहम जाग्रमी"! असे म्हणतात की त्याचवेळी आई भवानीने राजाना दर्शन देवून आशिर्वाद दिला त्यामुळ राजानी चोहोबाजुच्या शत्रुना नामोहरम करून""हिन्दवी स्वराज्याची "" निर्मिती केलि.
हल्ली हा सण मौजमजा म्हणुन साजरा केला जातो. बहुतेकवेळी हा सण मुलाच्या परीक्षेच्या कालात येतो. तसेच मधल्या दिवशी येत असतो. मग आयोजक आणि पालक मंडळी त्या नंतर येणारा शनिवार/रविवार पाहुन सोइनुसार साजरा करतात. फक्त सर्वानी एकत्र येवून वेगवेगले खेळ गाणी म्हणणे असा कार्यक्रम राबवत असतात. रात्रि मसाला दुध ,भेळ, विविध प्रकारचा फराळ करून आनंद साजरा करतात.
पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी आपली शस्रे शमिच्या झाडावर लपवून ठेवली होती .पण त्यांच्या शोधासाठी कौरवानी विराटराजावर स्वारी केली त्यावेळी अज्ञातवासाची मुदत संपल्याने पंडवांनी आपली लपवलेली शस्रे बाहेर काढून कौरवांचा पराभव केला तोहि दिवस विजयादशमिचाच. हल्ली हा सण साजरा करताना आपल्या भागात ,मुम्बई आणि उर्वरित महाराष्ट्रात शमी, आपटयाची पाने आणि झेंडूची फुले आणून पूजा केलि जाते. दारावर केशरी झेंडूची फुले आणि आंब्याच्या टालासहित पानांचे तोरण बांधले जाते.
घरातील स्रिया तुळशी समोर आखीव रेखीव रांगोळी काढुन अदृश्य रुपात येणाऱ्या "अपराजिता" देवीचे स्वागत करतात.
गावाकडे शेतकरी आपल्या बैलगाडया, शेतीची अवजारे, यांची पूजा करतात. शहरीभागात आपापल्या दुचाकी, चारचाकी वाहनांची पूजा करतात.
पण हे सर्व होताना एकीकडे पर्यावरणाची हानी होते आहे. आपटा आणि शमिच्या झाडांची पाने (बेसुमारपणे) तोडली जातात. त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी चिंताजनक आहे. कारण ही पाने आणि डहाल्या दुसऱ्या दिवशी चक्क कचऱ्यात पडलेल्या असतात.