Culture & Tradition Culture & Tradition रक्षाबंधन  (महिना : श्रावण)

RakshaBandhan

श्रावण पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. बहिण--भावाच्या पवित्र नात्याची महती सांगणारा हा सण भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.बहिण आपल्या भावाला औक्षण करून त्याच्या हातावर रेशमी/सुती धागा बांधते. त्याचवेळी नकळत आपल्या बहीणीचे रक्षण करण्याची जबाबदारी त्या भावावर येते. बहुतेक वेळी बहिण भावाकड़े जाते तर अपवादात्मक भाऊ स्व:त बहीणीकड़े जातो. कधी सुग्रास तर कधी सामिष भोजन बहिण-भाऊ आपल्या कुटुंबीयांसोबत एकत्रितपणे करतात. अशा वेळी तेथे आनंदी वातावरण निर्माण होते.

इतिहासात असा उल्लेख आहे की चितोड़ची राणी कर्मावतीच्या राज्यावर परकीय आक्रमण झाले तेव्हा तिने मोगल सम्राट हुमायुनला मदतीसाठी पत्र पाठविले त्यात लिहले की ह्या पत्रासोबत मी एक दोरा (राखी) पाठवित आहे.

तुमची बहीण संकटात आहे. तिचे रक्षण करा. पत्र पोचताच हुमायुन आपल्या प्रचंड सैन्यासह राणी कर्मावतिच्या मदतीला धावुन आला आणि तिच्या राज्यावरील आक्रमण करणाऱ्या राजाचा पराभव करून आपल्या मानस बहिणीचे रक्षण केले. तेव्हापासुन हा सण साजरा केला जातो.