Culture & Tradition
                                पितृपक्ष   (महिना : भाद्रपद)
                            
                        
                     
                    
                        
                    
                    
                        
                            
                        
                        भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष म्हणजेच पितृ पंधरवडा. आपल्या स्वर्गात गेलेल्या पुर्वजांना आमंत्रित करून काही ठिकाणी विधिवत श्राद्ध  घालुन त्यांना नमस्कार करून पंचपक्वान्नाचे जेवण घराच्या छप्परावर  दिले जाते.  कावळा हा आपल्या पूर्वजांचा प्रतीक मानला जातो. म्हणुन  आपण पूर्वजांसाठी  जो नैवेदय ठेवतो त्याला कागवास म्हटले जाते. आपल्या घरातील माणूस ज्या तिथीला  वारला असेल ती तिथि कोणत्याही महिन्यातली असली तरी ह्या पितृपक्षातील त्या तिथीला आपण श्राद्ध करावयाचे असते. ज्यांचे कुणी पूर्वज संन्यासी  होवून स्वर्गवासी झाले असतील तसेच जे घरातून निघुन गेलेले असून अनेक वर्षे परत न आल्यामुळे घर आणि समाजाने त्याला मृत मानले असेल अश्या लोकांचे श्राद्धविधि द्वादशीलाच करावेत असे संकेत आहेत. 
                        ज्यांना आपल्या आधीच्या पुर्वजांविषयी काहीही माहिती नसते अश्या सर्व पूर्वजांना अमावस्येच्या दिवशी नैवेदय रुपाने भोजन दिले जाते, म्हणुनच ह्या दिवसाला सर्वपित्री अमावस्या म्हणतात.
                        
                          असे म्हणतात की हे पंधरादिवस पुण्यकाळ  मानतात कारण  हे पंधरा दिवस  पितरांना स्वर्गातुन  पृथ्विवर येण्यासाठी सवलत दिली जाते. मात्र अजूनही कोणतेही शुभ कार्यासाठी  पितृपक्ष  व्यर्ज मानला जातो.