Culture & Tradition
पिठोरी अमावस्या (महिना : श्रावण)
श्रावण महिन्याच्या ह्या शेवटच्या दिवसाला विवाहित स्त्रियांच्या जिवनात अत्यंत महत्व आहे. पिठोरी पुजा म्हणजे आदिशक्ति पार्वतीकडे विवाहित स्त्रिने आपल्याला मुल व्हावे आणि मुल असेल तर ते दीर्घायु ,निरोगी, चारित्र्यवान व्हावे म्हणुन केलेले व्रत आहे. आपल्या भागात पिठोरीचे झाड म्हणुन एक पावसाळी वनस्पति उगवते. सुवासिनी दिवसभर उपवास करतात .
ह्या दिवशी संपूर्ण पशुधनाला सजवुन घरातील यजमानीण औक्षण करते.
प्रथम विधियुक्त गणेशपूजन करून तदनंतर आदिशक्ति पार्वतीची पूजा केलि जाते . खीरपुरीचा नैवेदय दाखवून आवाहन करिस्ये म्हणत हे आदिशक्ति माते माझ्या पोटी सद्गुणी संतति दे. ज्याना संतति असेल त्या स्रिया माझी संतति सुखसमृद्धित राहु दे दीर्घायु होवू दे असे साकडे घालतात. अश्या वेळी आजुबाजुच्या सुवासिनी स्रियांदेखील पुजेला नमस्कार करण्यासाठी येतात. संध्याकाळी उत्तरपूजा करून देवीला आपल्या मुळ स्थानी जाण्यास मोकळीक देतात आणि पूजा विसर्जन केले जाते.