Culture & Tradition Culture & Tradition जन्माष्टमी आणि गोपाळकाला (गोकुळ अष्टमी)  (महिना : श्रावण)

Gokul_ashtami

कंसाच्या अत्याचारी राजवटीत बंदी असलेल्या वसुदेव--देवकी यांच्या पोटी श्री विष्णुंनी आपल्या आठव्या अवतारात जन्म घेतला तो दिवस म्हणजे श्रावण महिन्यातील दुसऱ्या म्हणजेच कृष्णपक्षातील अष्टमी. श्रीकृष्ण जन्माची कथा सर्वश्रुत आहेच. पण आजच्या विज्ञान युगातही श्रीकृष्णजन्म तेवढ्याच उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. पाळणा सजवुन त्यात श्रीकृष्णाची बालमुर्ति ठेवली जाते. सप्तमीच्या रात्र सरत असताना रात्रिचे बारा वाजले की त्या मूर्तीला पाळण्यात घालुन "गोकुलेमध्ये अवतार धरिला कृष्ण देवकिच्या गर्भासी आला"

असे म्हणुन पाळणा हलविला जातो. ह्या वेळी काही माणसे लहान मुलांच्या रडण्याचा आवाजदेखिल काढतात. कृष्णजन्माचा प्रसाद म्हणुन सुंठवडा दिला जातो. ह्यावेळी रात्रभर जागरण करून गरबा खेळणे, फुगडया घालणे, भजन कीर्तन असे उपक्रम केले जातात. ह्या कार्यक्रमाचा उत्तरार्ध म्हणजेच गोपाळकाला (दहीहंडी). आबालवृद्ध, कष्टकरी, हवसे नवसे गवसे ,राजकीय पक्षाचे नेते ह्या सर्वांचा आवडता व लाडका सण. मजेचा थरार अनुभवायला मिळतो म्हणुन जनता खुश तर ह्या इव्हेंट मधुन आपली पोळी भाजुन घेता येते म्हणुन राजकीय नेते खुश.