Culture & Tradition
महाशिवरात्री (महिना : माघ)
माघ महिन्यातील शिवरात्रीस महाशिवरात्र असे म्हणतात. या दिवशी काही स्त्रिया महाशिवरात्री साठी शिवरात्र वात लावतात. ही वात आदल्या दिवशी साजूक तुपात भिजवून ठेऊन सकाळच्या वेळात लावली जाते.
काही ठिकाणी शिवलीलामृतातील अकरावा अध्याय वाचण्याची पध्दत आहे. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो.आपल्या खेडेगावात उकडहंडी बनवून प्रसाद म्हणून खाल्ला जातो. उत्तरप्रदेशात हा सण भांग पिऊन आनंदात साजरा करतात.