Culture & Tradition
माघी गणपती (महिना : माघ)
माघ शुध्द चर्तुर्थी हा दिवस म्हणजे गणपतीचा जन्मदिन. माघ शुध्द प्रतिपदेपासून माघ शुध्द पंचमीपर्यत हा उत्सव चालतो. गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीची सहस्त्र आवर्तने करतात. या दिवशी उपवास केला जातो.
या दिवशी गणपतीला तिळाचे लाडू बनवून प्रसाद दाखविला जातो.पंचमीच्या दिवशी पुरणाचे मोदक केले जातात. भाद्रपद महिन्यात ज्यांना गणपती बसविणे शक्य नसते तेही या दिवशी गणपती बसवितात.