Trust Community तेथे कर आमुचे जुळती

श्री. भरत नारायण ठाकूर

श्री. भारत नारायण ठाकूर हे २०१३-१४ साला करिता सो.पा.क्ष. संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. माहीम हे त्यांचे मूळ गाव. संघ कार्यास त्यांनी १९६५ सालापासून सुरुवात केली. गेल्या पंचेचाळीस वर्षांच्या काळात त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या संघामध्ये पार पाडल्या आहेत. सतत नऊ वर्षे संघाचे अंतर्गत हिशेब तपासणीस, क्रीडा समितीचे अध्यक्ष, युवा समितीचे अध्यक्ष, १९९३ ते २००६ पर्यंत एकूण तेरा वर्षे संघाचे खजिनदार पद, अशी महत्त्वाची पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहेत. जमाखर्चाची एक सोपी पद्धत त्यांनी अवलंबली आहे. २००५ साली विश्वस्तपदावर त्यांची निवड झाली. सन २००९ ते २०११ या दोन वर्षांसाठी त्यांची विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.

शालेय जीवनात हुषार विद्यार्थ्यांमधे गणना होणारे श्री. भरत ठाकूर आपल्या समाजातील पहिले वाणिज्य पदवीधर आहेत. ते व्यवसायाने Cost Accountant आहेत. Larsen & Toubro या जगातील नामांकित कंपनीतून डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावरून ते निवृत्त झाले आहेत. ते SAP कंप्यूटर प्रणालीचे फायनान्स व कण्ट्रोल मॉड्यूलचे तज्ज्ञ आहेत. त्यांची बुद्धीमत्ता, अनुभव आणि कामातील नैपुण्य याचा उपयोग करून घेण्यासाठी निवृत्तीनंतर ही त्यांची Larsen & Toubro Information Technology या सहाकंपनीच्या पूर्णवेळ सल्लागारपदी नऊ वर्षे नेमणूक करण्यात आली होती.

तरुणाईत हौशी नाट्य कलावंत व किकेटपटू असणाऱ्या श्री. भरत ठाकूरांनी स्पष्टवक्तेपणा, अभ्यासवृत्ती व निर्णयक्षमता या अंगीभूत गुणांमुळे प्रत्येक क्षेत्रातील स्वीकारलेल्या कामात सहज यश संपादन केले आहे. संघाच्या अर्थविषयक बाबींवर त्यांचे प्रभुत्व आहे. संघात दीर्घकाळ क्रीयाशील असल्यामुळे संघाच्या प्रथा व नियम यांचा त्यांना दांडगा अनुभव आहे. आपल्या संस्थेबरोबर क्षात्रैक्य परिषदेच्या कार्यात ही त्यांनी भाग घेतला आहे.

सतत सकारात्मक दृष्टीकोन ठेवणारे श्री. भरत ठाकूर संघाच्या काम-काजांत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असतात. तसेच संघकार्यात तरुणांचा सहभाग वाढावा यासाठीही ते प्रयत्नशील असतात.

त्यांना उत्तम आरोग्य लाभो व जीवनात अखंड यश लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.