Community
तेथे कर आमुचे जुळती
श्रीम. शालिनी लक्ष्मण पाटील
क्षात्रैक्य परिषदेचे दिवंगत नेते कै. बाळकृण्ण श्रीवर्धनकर यांच्या कन्या आणि ज्येष्ठ नेते कै. अॅड. लक्ष्मण पां. पाटील यांच्या पत्नी. अॅड. पाटील यांच्या पत्नी एवढीच ओळख मर्यादित न ठेवता, त्यांच्या बरोबरीने संघकार्यात झोकून देऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रीमती शालिनी पाटील या स्व. डॉ. हिराबाई भा. पाटील यांच्या नंतरच्या संघाच्या महिला अध्यक्षा आहेत. संघाच्या पहिल्या महिला विश्वस्त होण्याच्या मानही त्यांना मिळाला. संघाच्या महिला विकास समिती व महिला मेळाव्याच्या त्या संस्थापक सदस्या असून महिला विकास समितीच्या 'उमरोळी' येथील महिला संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले आहे.
सन १९९८ मध्ये बेटेगांव येथील वार्षिक अधिवेशनाच्या त्या अध्यक्षा होत्या. आपल्या अध्यक्षीय काळात त्यांनी कै. अरविंद हरी राऊत स्मारक आणि कै. ज. पां. राऊत स्मारकांची पूर्तता केली. संघाच्या विश्वस्त अध्यक्षपदावरून त्या दि. २३.११.२०१२ रोजी निवृत्त झाल्या. मुंबईतील अनेक संस्थांमध्ये त्या अजूनही कार्यरत असून त्यांनी तेथेही मानाची पदे भुषविली आहेत. त्यांच्या समाज सेवेची दखल घेऊन संघाने त्यांना राजाराम पाटील सन्मान पुरस्काराने सन्मानित केले आहे.