Trust Community तेथे कर आमुचे जुळती

श्री. लक्ष्मण माधव राऊत

सो.पा.क्ष.स. संघाचे पुनरूज्जीवन करण्यात त्यांनी भरीव कामगिरी केली. कर्मवीर जनार्दन पांडूरंग राऊत, कै. लक्ष्मण गोविंद राऊत ह्या सहकार्यांच्या समवेत तांगा करून समाजाच्या गावोगावी जाऊन त्यांनी समाज बांधवांशी संपर्क साधून संघाचे बंद पडलेले कार्य सुरु केले. संघाचे अध्यक्षपद सालवड आणि उमरोळी येथे भूषविले. तसेच संघाचे ते पहिले गृहपाल होते.

शिक्षण घेण्यासाठी ते बडोद्याला गेले होते. माहीम येथील शिक्षण संस्था आणि इतर संस्थेत कार्य केले. माहीम येथे सो.पा.क्ष. गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. बागाईत आणि पानांचा व्यापार हा त्यांचा व्यवसाय होता. त्यासाठी त्यांनी पाकिस्तान येथेही प्रवास केला. कै. लक्ष्मण माधव राऊत आणि माई लक्ष्मीबाई लक्ष्मण राऊत यांच्या नावाने एक वैद्यकीय साहाय्य निधी त्यांच्या कुटूंबियानी स्थापन केला. त्यातून गरजू समाज बांधवांना वैद्यकीय उपचारासाठी साहाय्य केले जाते.