Community
तेथे कर आमुचे जुळती
डॉक्टर हिराबाई भाऊराव पाटील
सो.पा.क्ष. संघातील आंग्लविद्याविभूषित पहिल्या महिला. त्यांचे कार्य त्यांच्या अगोदरच्या डॉ. रखमाबाई राऊत यांच्या तोडीचे होते. त्यांनीही वैद्यकीय सेवा देशातील विविध ठिकाणी करून वैद्यकीय व्यवसायाची साधन-शुचिता पाळून आरोग्यसेवेला न्याय दिला. संघातर्फे दिनांक ८-५-१९३८ रोजी श्री. हरेश्वर भास्कर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली केळवा रोड येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मानपत्र, चंदनी पेटी व हस्तिदंती पेपरवेट अर्पण करण्यात आला. कविवर्य के. नाथ यांनी 'यशोगान' ही कविता अर्पण करून यथोचित सत्कार केला.
पहिल्या महिला अध्यक्षा, केळवे अधिवेशन १९६५.
संघकार्यात मोठे आर्थिक योगदान देऊन समाज कार्य अमर केले.