Trust Community तेथे कर आमुचे जुळती

श्री. डॉ. मधुकर ब. राऊत

क्षात्रैक्य परिषदेच्या हीरक महोत्सवी वाटचालीत ज्यांनी सामाजिक पुरोगामी विचाराचे मार्गदर्शन केले त्यापैकी कै. डॉ. मधुकर बळवंत राऊत् हे जेष्ठ व मार्गदर्शक. ५० सदस्यीय पहिल्या कार्यकारी मंडळांत १९५० मध्ये ते उपाध्यक्ष होते.

समाजसविता डॉ. राऊत यांचा जन्म १९०६ साली झाला. आपल्या ५६ वर्षाच्याय आयुर्मर्यादेत त्यांनी शिक्षण, राजकीय, सामाजिक सुधारण क्षेत्रांत अनेक पदे विभूषित केली होती. १९३२ पासून वैद्यकीय व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली आणि तहह्यात सामाजिक आरोग्याची काळजी घेतली, सो.पा.क्ष.स. संघात त्यांनी आपल्या दिव्यदृष्टीने नवचैतन्य निर्माण केले. त्यांचे चैतन्यमयी व्यक्तिमत्व्, सुहास्य वदनाने रुग्णांची विचारपूस, योग्य निदान आणि उपाय कौशल्यामुळे मुंबईच्या सांस्कृतिक हृदयात म्हणजे दादर प्रभादेवी विभागांत अपूर्व यश मिळविले.

सो.पा.क्ष.स संघाचे दोन वर्षे अध्यक्ष, विश्र्वस्त होते आणि बुध्दिप्रामाण्यवादी पुरोगामी विचारांचा पाठपुरावा करुन त्यांनी पोटजातीच्या एकीकरणामध्ये सक्रिय योगदान दिले. क्षात्रैक्य परिषदेचे १९५२ साली अध्यक्ष स्थान भूषविले.

यथा काष्ठं च समेयातां महांदद्यौ । समेत्य च न्य पेयातां तावद् भूतसमागम: ॥

समाजसविता डॉ.म.ब.राऊत तथा भाईच्या निधनानंतर त्याची इच्छा समाजाची वास्तू व वैद्यकीय केंद्र व्हावे ही कल्पना सर्वानी उचलून धरली. त्याची अेक कल्पना वास्तव्यात आणण्याचे धाडस कै. अरविंदभाई राऊत, कै. रघुवीर पाटील, कै. डॉ. रमाकांत ब. राऊत, सोमवंशी पाठारे क्षात्रिय संघ्ज्ञ व भाईचे परम स्नेही श्री. प्रकाश मोहाडीकर यांच्या पुढाकाराने प्रत्यक्षात आली. त्याचे जावई रमेश पाठारे ह्यानी इलेकट्रिकल काम मोफत केले. ऑर्किटेकनी त्याचा मोबदला घेतला नाही.