Trust Community तेथे कर आमुचे जुळती

श्री. पुष्पकांत अनंत म्हात्रे

सो. पा. क्ष. स. संघाचे माजी विश्वस्त कै.पुष्पकांत अनंत म्हात्रे यांचा जन्म २६ मार्च १९४० रोजी झाला. त्यांच्या वयाच्या १० व्या वर्षी आईचे तर ११ व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या कै. पुष्पकांत म्हात्रेंचे बालपण किंग्ज सर्कल येथील बी.जी.होम फॉर चिलड्रेन या अनाथाश्रमात गेले. ज्या अनाथाश्रमाने त्यांना आश्रय दिला त्याच संस्थेच्या अध्यपक्षपदी जीवनाच्या अखेरपर्यंत कार्य करून संस्थेप्रती असलेली आपली बांधिलकी त्यांनी व्यक्त केली. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत ११ वी (तत्कालिन S.S.C.) पर्यंतचे शिक्षण लायन्स पायोनिअर हास्कूल माटुंगा येथे झाले.

वयाच्या १८ व्या वर्षी ते जूहू येथे वास्तव्यास आले. जुहू या गावीच त्यांची कारकिर्द बहरत गेली. आपल्या अंगिकृत गुणांनी त्यांनी शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दैदिप्यमान यश प्राप्त करून आपल्या व्यक्तिमत्वाची अष्टपैलुत्वाची झालर चढविली. जुहू येथील कार्य पसाऱ्यात अहोरात्र मग्न असुनदेखील मुंबई प्रमाणेच रायगड येथे मुरूड जंजिऱ्यापासून ठाणे जिल्ह्यातील पालघर डहाणू पर्यंत त्याने कार्यक्षेत्र विस्तारत गेले. अशा ह्या महान नेत्याला २२ एप्रिल २०१० रोजी देवाज्ञा झाल्याचे कळताच सर्व समाज हळहळला. सो.पा.क्ष.स संघाचा एक आधारस्तंभ कोसळला होता. एक तेजस्वी तारा निखळला होता. समाजबांधवाच्या सर्वांगिण उन्नतीसाठी झटणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व लोप पावले होते.

सामाजिक क्षेत्र: २० व्या वर्षी मुक्तेश्वर देवालयाच्या विश्वस्तपदी नेमणूक. सतत ५० वर्षे तहह्यात विश्वस्त देवालयाची सेवा. महाराष्ट्रातील पहिल्या सात मजली सिध्दसनातन मंदिराची मुक्तेश्वर मंदिराजवळ उभारणे हेमाडपंथी पद्धतीने मुक्तेश्वर मंदिराचा जिर्णोद्वार. १९६० साली जूहू नूतन युवक मंडळाची स्थापना. १९ साली जनसेवा मंडळाच्या सरचिटणीसपदी नेमणूक व या मंडळाच्या माध्यमातून शिक्षण व क्रीडाक्षेत्रात भरीव १९७८ साली सर्वसामान्य जुहू वासियांसाठी जूहू व्यायामशाळेची स्थापना. २९८७ साली जनसेवा क्रीडासंकूल व पी.ए. म्हात्रे क्रीडा प्रशिक्षण संस्थेची जुहू येथे उभारणी. मुंबई उपनगर झोपडपट्टी व भाडेकरू अध्यक्ष. विजय मर्चट अपंग पुर्वसन संस्था पुनर्वसन संस्था उपाध्यक्ष. २००९ साली बि.जि. होम फॉर चिल्ड्रेन या अनाथ अध्यक्ष.

शैक्षणिकक्षेत्र: १९७१ साली भगवती नानक पूर्व प्राथमिक शाळेची स्थापना. १९७१ साली के. के. इंग्लिश हायस्कूल या शाळेची गरीब विद्यार्थ्यांसाठी स्थापना, ज्या ठिकाणी सध्या १५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. १९८० साली नरपड येथील 'स्नेहवर्धक मंडळाच्या' माध्यमिक शाळेला भरीव देणगी दिली म्हणून मंडळाने शाळेचे नामरण कै. अनंत जनार्दन म्हात्रे माध्यमिक विद्यालय असे केले. त्याचप्रमाणे त्यांची तहह्यात विश्वस्तपदी नेमणूक केली. या शाळेला कै. अन्नपूर्णा अनंत म्हात्रे सभागृह बांधून दिेले. १९९६ साली ओशिवरा कॉलेजची जुहू येथे स्थापना. २००३ साली कै. रेखाताई पुष्पकांत म्हात्रे सायन्स कॉलेज व श्री पुष्पकांत अनंत म्हात्रे कॉमस्र कॉलेजची स्थापना. पायोनिअर एज्यूकेशन ट्रस्टच्या संस्थेवर ८ वर्षे अध्यक्ष म्हणून व मृत्यूपर्यंत विश्वस्त म्हणून कार्यरत. सदर संस्थेच्या माटुंगा व कांदिवली येथे मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. साध्वी सावित्रीबाई फुले शिवणकला व भरतकाम संस्थेचे अध्यक्ष.

राजकीय क्षेत्र: १९७३ ते १९९६ पर्यंत मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेवक पदी कार्यरत. १९७६-७७ बाजार व उद्यान समितीचे अध्यक्ष. १९८६-८७ व १९९३-९४ असे दोन वेळा मुंबई म.न.पा. च्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक. १९९४ साली कॉग्रेस (आय) तर्फे महापौर पदाची निवडणूक लढविली. १९९५-९६ साली मुंबई महानगर पालिका सभागृह नेतेपदी निवड. १९९५ साली जपान येथील जागतिक महापौर मुंबई महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व केले.

सो.पा.क्ष.स. संघासाठी कार्य: संघाकडे आर्थिक चणचण असताना, मुंबई महानगर पालिकेकडून समाजकार्यासाठी अनुदारन मिळवून देण्यात मोठा वाटा. या अनुदानामुळे संघाचा निधी लक्षणीयरित्या वाढण्यासा मोठी चालना मिळाली. सो.पा.क्ष.स. संघाच्या मुंबईच्या वास्तुसाठी मोठा सहभाग. १९८७ ते २००२ अशी १५ वर्षे सा.पा.क्ष.स. संघाच्या विश्वस्तपदी कार्यरत. सन १९८०,१९८१, १९८२ व १९८७ असे चार वेळा सो.पा.क्ष.स. संघाच्या अध्यक्षपदी विराजमान. १९९६ साली चौकळशी, पाचकळशी या वाडवळ पोटजातीचा इतर मागासवर्गिय समाजात (O.B.C) समावेश करुन घेण्यासाठी व महाराष्ट्र शासनाकडून तसा अध्यादेश (G.R) मिळविण्यासाठभ् अथक परिश्रम केले. क्षात्रैक्य परिषदेच्या माध्यमातून मुंबई, मुरुड-जंजिरा, रायगड व ठाणे जिल्ह्यात भव्य मेळावे व कृषिप्रदर्शनाचे आयोजन, क्षात्रैक्य परिषदेच्या विश्र्वस्त्मंडळाचे अध्यक्षपद.

सहकार व आर्थिक क्षेत्रातील कार्य: १९६८ साली जुहू येथिल फेरिवाल्यांसाठी सहकारी तत्त्वावर जुहू विविध गृहोपयोगी वस्तू विक्रेते सहकार सोसायटीची स्थापना करुन मुंबई शहरात पहिली सहकार मुडई बांधली. १९८३ साली जुहू नागरिक सहकारी पतपेढीची स्थापना.

पुस्कार: गरीब व गरजू लोकांना मदत केल्याबद्दल, नवी दिल्ली येथिल संस्थेकडून 'दी कौन्सिल फॉर इकॉनॉमिक ग्रोथ अँड रिसर्च' या पुरस्काराने सन्मानित. १९७९ साली सो.पा.क्ष.स. संघकार्याबद्दल मानपत्र अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वास सर्व समाज बंधू भगिनीतर्फे भावपूर्ण आदरांजली.