Community
तेथे कर आमुचे जुळती
श्री. ज. पा. राऊत
कै. ज. पा. राऊत म्हणजेच कै. जनू मास्तर यांचा जन्म २७ मार्च १८९७ रोजी ऐतिहासिक महिकावतीनगरी (माहिम) येथे सोमवंशी पाठारे क्षत्रिय समाजोन्नती संघ म्हणून ज्ञातीसंस्था असलेल्या चौकळशी पोटजातीत झाला. कठीण परिस्थितीतही संकटांचा मुकाबला करून त्यांनी आपले जीवन स्वावलंबी बनविले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केळवे येथे शिक्षकाची नोकरी केली. पुढे शिक्षकी पेशाचा राजीनामा देऊन त्यांनी शेती वाडी व पान व्यापारात लक्ष घातले. वयाच्या २० व्या वर्षांपासूनच त्यांनी समाजाच्या ज्ञाती संस्थेसाठी कार्य सुरू केले.
पालघर येथे असलेल्या डॉ. मधुकर राऊत स्मारक समाज मंदिर उभारण्यासाठी मोलाची मदत केली. स्वत: टांगा घेऊन गावोगावी फिरून समाज मंदिर उभारण्यासाठी निधी जमा केला. तसेच पालघर पूर्व येथे कै. भाऊराव देवजी पाटील वस्तीगृह इमारतीसाठी त्यांचे स्नेही पालघर तालुका काँग्रेसचे श्री. रामकरण दुबे यांच्याकडून जागा देणगी रुपाने मिळवली व निधी जमवून इमारत बांधली.
पालघर सारख्या ठिकाणी महाविद्यालय काढणे अवघड काम असताना महाविद्यालय उभारण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती म्हणून गावोगाव फिरून देणगीरूपाने निधी उभारला. ते १९६९ पासून अखेरपर्यंत सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळींचे उपाध्यक्ष होते. त्यांचा भूदान चळवळीतही पुढाकार होता. त्यांच्या बहुविध कामाची शासनाने नोंद घेऊन त्यांना "जस्टिस ऑफ पीस" हा बहुमान देऊन त्यांचा गौरव केला. त्यांनी सतत साठ वर्षे विविध क्षेत्रात काम केले.
सामाजिक कार्य:
- सन १९४५ ते १९५१ सोमवंशी पाठारे क्षत्रिय संघाचे अध्यक्ष.
- सन १९४२ ते १९७८ पर्यंत विश्वस्त समितीचे अध्यक्ष.
- सन १९४९ क्षात्रैक्य परिषदेची स्थापना (एक संस्थापक).
- सन १९२५, १९४०, १९७2 सालच्या दुष्काळात आपदग्रस्तानां मदत. पालघर तालुका दुष्काळ निवारण समितीचे अध्यक्ष.
राजकीय कार्य:
- भुदान चळवळीत सहभाग व पदयात्रा.
- पालघर तालुका लोकल बोर्डाचे सभासद.
- ठाणे जिल्हा लोकल बोर्डाचे सभासद.
- पालघर तालुका विकास समितीचे चेअरमन.
- केळवा-माहिम परिसरातील जस्टिस ऑफ पीस मिळविणारे पहिले नागरिक.
- पालघर तालुका काँग्रेसचे कमिटी, ठाणे जिल्हा काँग्रेस समितीचे सभासद तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दोन वेळा सभासद.
निधन: ३१-१२-१९७८.